ग्रामसमृद्धीचा प्रवास तुमच्या नजरेतून
इथे जपले आहेत विकासाचे प्रेरणादायी क्षण – गाव घडताना पाहा आणि अनुभवा
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रिळे हे गाव सातत्याने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे एक प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केंद्रबिंदू ठरले आहे. गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच सामाजिक सलोखा, सांस्कृतिक जपणूक, धार्मिक समर्पण, कला आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती, दर्जेदार शिक्षण, कृषी सुधारणा, आरोग्य सेवा, महिला विकास, जलसंधारण, वृक्षसंवर्धन, तसेच युवकांसाठी कौशल्यविकास यांसारख्या अनेक उपक्रमांचा प्रभावी अंमलबजावणी केली जाते. या सर्व कार्यांमुळे रिळे गावाने प्रगतशीलतेचा आदर्श निर्माण केला असून, अल्पावधीतच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या गावांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या विविध उपक्रमांचे काही निवडक क्षण खाली दिले आहेत…!
आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची सेवा देणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे.